Address:
Hero Banner

इंस्टाग्राम आणि फेसबुक वर कनेक्ट व्हा

शाश्वत विकासासाठी सदैव हक्काचा माणूस!

सर्व मतदार बंधू - भगिनींनो,
सस्नेह नमस्कार!
समाजकारणाच्या माध्यमातून, लोकप्रतिनिधीच्या नात्याने आपल्या सर्वांशी आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे नाते घट्टच आहे. त्या बळावरच मी आजवर विकासकामांमध्ये भरीव योगदान देऊ शकलो, याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. अशीच खंबीर साथ पुढेही लाभणार हा ठाम विश्वास बाळगून नव्याने तयार झालेल्या प्रभाग क्रमांक ३८ ''बालाजीनगर, आंबेगाव-कात्रज'' च्या शाश्वत विकासासाठी कटिबद्ध आहे.
आजवरच्या माझ्या सामाजिक - राजकीय प्रवासाचे तुम्ही सर्वजण साक्षीदार आहात. एक काळ असा होता की, नागरी सुविधांची वानवा होती. जीवघेणी वाहतूक असो, आरोग्यविषयक प्रश्न हे जटील व गंभीर होते. एकप्रकारे पुण्याचे दक्षिण प्रवेशद्वार म्हणजे समस्यांचे आगार असे विदारक चित्र होते. मात्र केवळ आणि केवळ लोकाभिमुख विकासकार्याला प्राधान्य दिल्याने आज बालाजीनगर, धनकवडीच काय अगदी दक्षिण पुण्याचा कायापालट झाला आहे आणि विकासासाठी तो दिशादर्शकही ठरला आहे.
महापौर पदाच्या कारकिर्दीतून संपूर्ण पुणे शहराच्या विकासाला गती दिली. स्वारगेट, इंजिनिअरिंग कॉलेज, धनकवडी येथील प्रशस्त उड्डाणपूलांमुळे पुणेकर वाहतूक कोंडीतून मुक्त झाले. स्व.केशवराव जेधे उड्डाणपुलाची निर्मिती, धनकवडी येथील सदगुरु श्री.शंकर महाराज उड्डाणपूल यामुळे आज वाहतूक गतिमान व सुरक्षित झाली आहे. पीएमपी बस सेवाही सक्षम बनली आहे. मेट्रो प्रकल्पासाठी माझ्याच कारकिर्दीत पाठपुरावा करण्यात आला. कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. नदी सुधार योजनेची मुहूर्तमेढही माझ्या महापौरपदाच्या कारकिर्दीतच रोवली गेली. 'कॉफी टेबल बुक'च्या माध्यमातून जगाला पुण्याची नव्याने ओळख झाली. खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटीची पायाभरणी महापौरपदाच्या कारकिर्दीत झाली. शहर असो प्रभाग, तुम्ही जी जी जबाबदारी सोपवली ती प्रामाणिकपणे पार पाडली. आपल्या सहकार्यामुळेच हे सर्व शक्य झाले. प्रत्येक समस्येचे निराकरण, प्रत्येक नागरिकाला सुविधा देण्यासाठी मी सदैव तत्पर आहे. आपण दिलेली साथ आणि विश्वास पुढेही कायम राहील, याची मला खात्री आहे. नव्याने तयार झालेल्या प्रभाग क्रमांक ३८ “बालाजीनगर, आंबेगाव – कात्रजच्या ” सर्वसमावेशक, शाश्वत आणि लोकाभिमुख विकासासाठी मी कटिबद्ध आहे.

श्री. दत्तात्रय धनकवडे

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी
सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य
मा. महापौर , पुणे नगरसेवक पुणे म. न. पा.

सद्गुरू श्री शंकर महाराज उड्डाणपुल

कात्रज उड्डाणपुल

चाहूल मेट्रो सिटीची

कै. काशिनाथ आनाजी धनकवडे पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र व प्रसुतीगृह

स्व. माणिकचंद नारायणदास दुगड हॉस्पिटल

एल.ई.डी लाईट उड्डाणपुल

आरोग्य शिबीर

आरोग्य जनजागृती

शैक्षणिक वस्तू

अंतर्गत रस्ते

विकासकामे

गॅलरी

व्हिडिओज